शैक्षणिक

पंधरा मिनिटात दहावीचा पेपर फुटला...

10th class paper broke in 15 minutes


By nisha patil - 2/21/2025 5:55:49 PM
Share This News:



पंधरा मिनिटात दहावीचा पेपर फुटला...

शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी घेतलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना पहिल्याच दिवशी अपयशी ठरल्या आहेत. पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका फुटल्याची गंभीर घटना जालन्यात उघडकीस आली असून, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आली, आणि त्यानंतर काही ठिकाणी उत्तरपत्रिकांच्या छपाई करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.


पंधरा मिनिटात दहावीचा पेपर फुटला...
Total Views: 36