बातम्या
मुंबई येथे 130 वी डाक अदालत
By nisha patil - 10/3/2025 7:59:17 PM
Share This News:
मुंबई येथे 130 वी डाक अदालत
कोल्हापूर, : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई व्दारे 130 वी डाक अदालत 26 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता मुंबई जीपीओ बिल्डिंग (दुसरा मजला) येथे आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्ट सेवेमध्ये सहा आठवड्यांत निराकरण न झालेल्या तक्रारी (टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र इत्यादी) या डाक अदालतीत विचारात घेतल्या जातील. तक्रारीसाठी संबंधित अधिकाऱ्याचे नाव, तारीख व इतर तपशील समाविष्ट करणे आवश्यक असून, दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत सचिव, सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी) आणि सचिव, डाक अदालत यांच्या कार्यालय (मुंबई एनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 4 वा माळा, मुंबई 400001) कडे दोन प्रती पाठवाव्यात
मुंबई येथे 130 वी डाक अदालत
|