बातम्या
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमुळे १४ जणांचा मृत्यु
By nisha patil - 1/29/2025 12:16:58 PM
Share This News:
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमुळे १४ जणांचा मृत्यु
लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
बुधवारी रात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झालीय. या अपघातात 14 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अमृतस्नानमुळे पूल बंद झाले.
त्यामुळे संगमावर करोडोंची गर्दी जमू लागली. त्यामुळे काही लोक बॅरिकेड्समध्ये अडकून पडले. हे पाहून चेंगराचेंगरी झाल्याची अफवा पसरली. संगम नाक्यावर स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग नव्हते. लोक आले होते त्याच मार्गाने परत जात होते.
अशा परिस्थितीत जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा लोकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. ते एकमेकांवर पडत राहिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, भाविकांनी संगमावरच स्नान करण्याचा विचार करू नये. गंगा सर्वत्र पवित्र आहे, जेथे असेल त्याच तीरावर स्नान करावे.
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमुळे १४ जणांचा मृत्यु
|