विशेष बातम्या
घरफाळा थकबाकीपोटी 14 मिळकती सील.
By nisha patil - 8/3/2025 10:35:09 PM
Share This News:
घरफाळा थकबाकीपोटी 14 मिळकती सील.
महापालिकेच्या घरफाळा विभागाची कारवाई
महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देण्यात आली होती. परंतू सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. अशा थकबाकीदारांच्या मिळकतीवर घरफाळा विभागाच्यावतीने कारवाई करण्यास सुरु केले आहे. यामध्ये आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदानअंतर्गत जीवबानाना पार्क व आपटेनगर परिसरातील 14 मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये प्रकाश काशिनाथ मोरे, सुर्याजी भिमराव इंगळे, रामाश्रय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्रीनिवास अनिल वनारसे, वसंत दत्तात्रय पारळे व स्नेहल प्रविण हुन्नूरे या मिळकतधारकांची थकीत रक्कम रुपये 3 लाख 88 हजार 678 इतकी थकबाकी असल्याने या मिळकतीसह एकूण 14 मिळकती सील करण्यात आल्या आहेत.
तरी शहरातील थकबाकीदारांनी अद्यापही आपला घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा मिळकती सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आलय.
घरफाळा थकबाकीपोटी 14 मिळकती सील.
|