बातम्या

त्रिभुवन विमान विमानतळावरील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू,

18 killed in Tribhuvan airport accident


By nisha patil - 7/24/2024 11:15:50 PM
Share This News:



नेपाळची राजधानी काठमांडूहून जाणारे विमान आज बुधवारी सकाळी त्रिभुवन विमानतळावर कोसळले.  या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
 विमानात क्रू मेंबर्स आणि एअरलाइनचे कर्मचारी असे एकूण 19 जण होते.या दुर्घटनेत केवळ पायलट बचावला आहे. पायलटवर सध्या उपचार सुरू आहेत.

 

फ्लाइटमध्ये केवळ कर्मचारीच होते. विमानाची ‘सी-चेक’ म्हणजेच चाचणी सुरू होती.अपघातानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नेपाळी लष्करानेही बचावकार्यासाठी आपली टीम विमानतळावर तैनात केली आहे.
         त्रिभुवन  एअरपोर्टच्या प्रमुखांनी सांगितलं की काठमांडूहून पोखरा येथे जाणाऱ्या विमानाने चुकीचं वळण घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.एअरपोर्ट प्रमुख जगन्नाथ निरौला यांनी बीबीसी नेपाळीला सांगितलं, “उड्डाण घेतानाच विमान उजवीकडे वळलं, त्याला डावीकडे वळायचं होतं. या अपघाताचं कारण चौकशीअंती कळेल. उड्डाण केल्यानंतर एका मिनिटाच्या आतच हा अपघात झाला."
             

काठमांडू येथील पोलीस अधिकारी दिनेशराज मैनाली यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 11.15 वाजता विमान अपघाताची माहिती मिळाली.पेट घेतलेल्या विमानातून पायलटची सुटका करण्यात आली आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या काठमांडू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.आतापर्यंत दोन मृतदेह सापडल्याचं विमानतळावरील बचाव कार्य टीमने सांगितलं आहे.


त्रिभुवन विमान विमानतळावरील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू,