बातम्या

२५-१५ योजनेतून २० लाख रुपये मंजूर: कोरोची येथील साई कॉलनीत सांस्कृतिक भवन स्लॅब टाकण्याचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते

20 lakhs sanctioned from 25 15 scheme


By nisha patil - 5/9/2024 8:37:30 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे 25-15 योजनेतून मंजूर झालेल्या २० लाख रु. कोरोची येथील साई कॉलनी येथे सांस्कृतिक भवन स्लॅब टाकणे या कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

यावेळी माजी सरपंच शैलेजा पाटील, ग्रा.पं. सदस्य शीतल पाटील, ग्रा.पं.सदस्य संजय शहापुरे, ग्रा.पं. सदस्य विकी माने, महेश कडाले, हनमंत पाटील, सागर पाटील, मिस्ट्री सर, शहा सर, सतीश पाटील, अभिनंदन पाटील, बंडा पाटील, राजू सुतार, विनायक बचाटे, प्रशांत काटवा, सुनील सोमाने, अनिल कडाणे, मनोहर खारकांडे, विठ्ठल यलगुद्रे, सागर साळुंखे, राजेंद्र भावीकट्टी, रामदास टिकले, अक्षय बरकाळे, सलीम मिनशिकारी, सुरेश चौगुले, निखील माळी, महादेव चिखलकर, प्रदीप कणोजे, रमेश पाटील, रामदास चिखले, सदाशिव पवार, अश्विनी कडाले, वर्षा पाटील, ज्योती भावीकट्टी, उज्वला माने, मेघा दावणे, सुनिता दावणे, रुपाली सुतार, सुनिता सुतार,सरिता कडावे, गीता कडावे, दिपा पाटील, कविता परमाने, शांताबाई कडोल, अर्चना सोमाने, रतन पाटील, माधुरी साळुंखे, मालती पट्टणकुडे यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


२५-१५ योजनेतून २० लाख रुपये मंजूर: कोरोची येथील साई कॉलनीत सांस्कृतिक भवन स्लॅब टाकण्याचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते