बातम्या

३० वर्षांची प्रतीक्षा संपली! चोकाक- अंकली रस्त्याच्या भूसंपादनास गती – शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला

30 year wait is over! Land acquisition


By nisha patil - 9/4/2025 8:48:48 PM
Share This News:



३० वर्षांची प्रतीक्षा संपली! चोकाक- अंकली रस्त्याच्या भूसंपादनास गती – शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला

गेल्या ३० वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर–सांगली महामार्ग (रस्ता क्र. १६६) च्या चोकाक ते अंकली दरम्यानच्या भूसंपादनास अखेर गती मिळाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने फक्त ३० मिनिटांत निर्णय घेण्यात आला.

या ऐतिहासिक बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, माजी आमदार राजेंद्र यड्रावकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पूर्वी शेतकऱ्यांना गुणांक १ नुसार मोबदला देण्यात येत होता. आता गुणांक २ प्रमाणे दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांचा विरोध संपुष्टात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, “रस्त्याचे काम रखडू नये यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अडथळे आल्यास तातडीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”

खासदार धैर्यशील माने यांनी मंत्री बावनकुळे यांचे आभार मानून हा निर्णय “३० वर्षांचा प्रश्न ३० मिनिटांत सोडवणारा” असल्याचे सांगत त्यांचा मानाचा मुजरा केला.

हा निर्णय कोल्हापूर–सांगली महामार्गाच्या विकासास नवसंजीवनी ठरणार आहे.


३० वर्षांची प्रतीक्षा संपली! चोकाक- अंकली रस्त्याच्या भूसंपादनास गती – शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला
Total Views: 28