विशेष बातम्या

निवडे येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन – शेतकऱ्यांना दिलासा!

33 11 KV Substation inaugurated at Khaithe


By nisha patil - 3/18/2025 5:57:20 PM
Share This News:



निवडे येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन – शेतकऱ्यांना दिलासा!

खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण

पन्हाळा तालुक्यातील निवडे येथे महाराष्ट्र कृषी पंप धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडले. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यातील समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

यावेळी कोल्हापूर परिमंडळ मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दिपकराव पाटील, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, तसेच महावितरणचे अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय असून, कृषी पंपांसाठी वीज पुरवठा अधिक सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली.


निवडे येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन – शेतकऱ्यांना दिलासा!
Total Views: 28