विशेष बातम्या
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४८वा वर्धापन दिन उत्साहात
By nisha patil - 2/21/2025 5:48:19 PM
Share This News:
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४८वा वर्धापन दिन उत्साहात
कागल.येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४८वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.
कारखान्याच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज,कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास व कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेस कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक,संचालिका सौ.रेखा पाटील,सौ.सुजाता तोरस्कर, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद शेतकरी,पुरवठादार,हितचिंतक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४८वा वर्धापन दिन उत्साहात
|