बातम्या
थकबाकीपोटी शहरातील 5 दुकान गाळे सील
By nisha patil - 1/28/2025 7:21:14 PM
Share This News:
महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने गायकवाड वाडा, महात्मा गांधी विद्यालय मार्केट, भास्करराव जाधव वाचनालय इमारतीमधील 5 दुकानगाळे थकबाकी असल्याने सोमवारी सील करण्यात आले.
यावेळी वसुली पथकामार्फत इतर थकबाकीदारांची चालू आर्थिक वर्षातील मागणीसह भाडे रु.4 लाख 75 हजार वसूल करण्यात आल. महापालिका मालकीचे सर्व मार्केटमधील गाळेधारकांना सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे थकबाकीदारांना भरण्याबाबत नोटीस देऊन कळविण्यात आले होते. त्यानुसार काही गाळेधारकांनी सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे भरले आहे.
परंतू वारंवार सूचना देऊन व लेखी कळवूनही बहुतांश गाळेधारकांनी थकीत भाडे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अति.आयुक्त राहूल रोकडे व सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अरुण भोसले, जर्नादन भालकर, मनिष अतिग्रे, विष्णु चित्रुक, सदानंद फाळके यांनी ही सीलची कारवाई केली.
थकबाकीपोटी शहरातील 5 दुकान गाळे सील
|