बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजार हक्काची घरे – "आम्ही सोबती घरकुलाचे" मोहिमेचा शुभारंभ
By nisha patil - 3/2/2025 1:01:06 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजार हक्काची घरे – "आम्ही सोबती घरकुलाचे" मोहिमेचा शुभारंभ
कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय योजनांमधून ५० हजार हक्काची घरे उभारण्यासाठी "आम्ही सोबती घरकुलाचे" या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांना पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे नियोजन आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, अशी सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी केली. १० एप्रिलपर्यंत घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तूंचे बक्षीस देण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजार हक्काची घरे – "आम्ही सोबती घरकुलाचे" मोहिमेचा शुभारंभ
|