बातम्या
जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग
By nisha patil - 9/7/2024 2:35:32 PM
Share This News:
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- शिरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली व बाजारभोगाव, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली, कोवाड व उमगाव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व सिध्दनेर्ली, तुळशी नदीवरील -बीड, धामणी नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कुंभी नदीवरील- कळे व शेनवडे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे 51 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.97 टीएमसी, तुळशी 1.75 टीएमसी, वारणा 17.29 टीएमसी, दूधगंगा 8.66 टीएमसी, कासारी 1.25 टीएमसी, कडवी 1.69 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.37 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 1.06 टीएमसी, जंगमहट्टी 0.97 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.00 टीएमसी, सर्फनाला 0.27 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.11 फूट, सुर्वे 31.7 फूट, रुई 61.6 फूट, इचलकरंजी 57.6 फूट, तेरवाड 49.6 फूट, शिरोळ 40.6 फूट, नृसिंहवाडी 37 फूट, राजापूर 27.1 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 13.10 फूट अशी आहे.
जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग
|