राजकीय
56 जण पायाला बांधून फिरते : चित्रा वाघ
By nisha patil - 3/21/2025 4:46:42 PM
Share This News:
56 जण पायाला बांधून फिरते : चित्रा वाघ
चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारे यांचा अप्रत्यक्ष हल्लाबोल..
दिशा सालीयन व संजय राठोड या विषयावर चर्चा होत असताना चित्रा वाघ यांनी संतापून छप्पन जन पायाला बांधून फिरते असं वक्तव्य केलं होतं आता त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार सुषमा अंधारे यांनी घेतलाय.शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "सभागृहाची सुसंस्कृत परंपरा आणि गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या की, 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते, हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!" असे अंधारे यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले.
त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे
56 जण पायाला बांधून फिरते : चित्रा वाघ
|