बातम्या

जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग

63 dams in the district under water


By nisha patil - 5/8/2024 3:07:21 PM
Share This News:



जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 6 व 7  खुले असून सध्या धरणातून 4 हजार 356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड व आरे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे व करंजफेण, कुंभी नदीवरील- कळे व शेणवडे, धामणी नदीवरील- सुळे, वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे व सरुडपाटणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड, तुरुंबे व कसबा वाळवे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - ऐनापूर, निलजी, गिजवणे व हरळी, घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, हिंडगाव, तारेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव व ढोलगरवाडी असे एकूण 63 बंधारे पाण्याखाली आहेत.

 आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.21 टीएमसी, तुळशी 3.30 टीएमसी, वारणा 29.09 टीएमसी, दूधगंगा 22.13 टीएमसी, कासारी 2.36 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.55 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 40.7 फूट, सुर्वे 40.10 फूट, रुई 71.6 फूट, इचलकरंजी 69.6 फूट, तेरवाड 65.9 फूट, शिरोळ 64.6 फूट, नृसिंहवाडी 64 फूट, राजापूर 52.4 फूट तर नजीकच्या सांगली  39.1 फूट व अंकली 44.4 फूट अशी आहे.


जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग