विशेष बातम्या
८ मुलांनी केली आईची उपेक्षा; अंत्यसंस्कारालाही कोणी आले नाही पुढे
By nisha patil - 7/4/2025 4:05:39 PM
Share This News:
८ मुलांनी केली आईची उपेक्षा; अंत्यसंस्कारालाही कोणी आले नाही पुढे
आठ मुले पण कुणालाही फूटला नाही दयेचा पाझर..
माय मेली... पण लेकरांनी फिरवली पाठ! मोहोळ तालुक्यात माणुसकीला काळीमा
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आठही मुलांनी आणि सख्ख्या भावाने देखील अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्यास नकार दिला.
ज्या आईने रक्ताचं पाणी करून, काबाडकष्टाने आठ मुलांना वाढवलं, त्याच आईचा मृतदेह समोरून गेला, तरीही कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत असून समाजमन हादरवणारी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
८ मुलांनी केली आईची उपेक्षा; अंत्यसंस्कारालाही कोणी आले नाही पुढे
|