बातम्या

अल्पवयीन मुलीवर २६ वर्षाच्या तरुणाचा अत्याचार.

A 26 year old man molested a minor girl


By nisha patil - 9/19/2024 10:59:36 PM
Share This News:



  कोल्हापुरातील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शाररिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी दौलत नगर येथील अरुण अजय पाटील या २६ वर्षीय तरुणाला राजाराम पुरी पोलिसांनी अटक केलीय . याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर २०२२ पासून आरोपीने अत्याचार केला .

काल रात्री पावणे बाराच्या सुमारास तो पीडित मुलीच्या घरी कोण नसताना शिरला आणि जबरदस्तीने तिच्याशी शाररिक सम्बन्ध ठेवले.याचबरोबर गेल्या आठवडाभरापूर्वीही आरोपीने तिच्या राहत्या घरी तिच्यावर अत्याचार केला होता.  दरम्यान या प्रकरणी पीडितेने पालकांना सांगितल्यावर त्यांनी याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी अरुण पाटीलला अटक करण्यात आलीय .


अल्पवयीन मुलीवर २६ वर्षाच्या तरुणाचा अत्याचार.