बातम्या
विषबाधित रुग्णांची आ.राहुल आवाडेंनी घेतली भेट...
By nisha patil - 5/2/2025 5:39:35 PM
Share This News:
विषबाधित रुग्णांची आ.राहुल आवाडेंनी घेतली भेट...
आ. डॉ. राहुल आवाडे यांनी रुग्णांची भेट घेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी
शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त महाप्रसादानंतर सुमारे 300 ते 350 नागरिकांना विषबाधा झाली असून, त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयासह विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच आ. डॉ. राहुल आवाडे रुग्णालयात दाखल झाले व परिस्थितीची पाहणी करून डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
त्यांनी आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली.आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर व नर्सेस रुग्णांच्या उपचारासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
विषबाधित रुग्णांची आ.राहुल आवाडेंनी घेतली भेट...
|