बातम्या
मध्यवर्ती बस स्थानकात व्यापाऱ्याची 95 लाख 69 हजार किंमतीचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास
By nisha patil - 1/7/2024 9:57:05 PM
Share This News:
कोल्हापूरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पुण्याकडे निघालेल्या एका दागिने विक्रेत्याच्या हातातील सुमारे 95 लाख 69 हजाराचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केले.ही घटना रविवारी सायंकाळी घडलीय.याप्रकरणी सुजित सिंग चौहान यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंबई येथील सुजितसिंग चौहान हे दागिने विक्री करणारे विक्रेते गुरुवारी 28 तारखेला मुंबईहून कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले. येताना पुण्यात मुक्काम करून तेथील काही सराफांची भेट घेवून त्यांना नवीन दागिन्यांची माहिती दिली. रविवारी सकाळी ते कोल्हापुरात आले. चौहान यांनी कोल्हापुरात गुजरी येथील काही सराफ व्यवसायिकांना आपल्याकडील दागिने दाखवले. यानंतर सायंकाळी ते कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून शिवनेरी बस मधून पुण्याकडे जाण्यासाठी निघाले.यावेळी एसटीच्या रॅकमध्ये ठेवलेली सुमारे 95 लाख 69 हजार रुपयाचे दागिने असलेली बॅग अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी चौहान यांनी शाहुपुरी पोलिसांत फिर्याद दिली.पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
दरम्यान चोरट्याचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलीय.
मध्यवर्ती बस स्थानकात व्यापाऱ्याची 95 लाख 69 हजार किंमतीचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास
|