बातम्या

कोल्हापुरात चिमुकलीवर बलात्कार करून हत्या...

A child was raped and killed in Kolhapur


By nisha patil - 8/22/2024 4:12:31 PM
Share This News:



कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून.. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  मुलगी काल (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. बदलापूर मधील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.


कोल्हापुरात चिमुकलीवर बलात्कार करून हत्या...