बातम्या
इचकरंजीतील महिला रुग्णावर यशस्वी हृदयाची वेगाने होणारी धडधड थांबवणारी पेसमेकर शस्त्रक्रिया करुन जीवनदान.....
By nisha patil - 10/10/2024 2:52:06 PM
Share This News:
इचकरंजीतील 56 वर्षीय महिलेला वारंवार धडधड होऊन चक्कर येणे, शुद्धी हरपून जाणे , छातीत दुखणे आणि थकवा यामुळे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णाला वारंवार बेशुद्ध झाल्याने अनेक वेळा हृदयाचे शॉक देऊन शुद्धीत आणले जात होते. यामुळे रुग्णाला खूप त्रास होत होता.
सततच्या त्रासामुळे, डॉ. रवींद्र पवार ( वैद्यकीय अधीक्षक ,ESIC हॉस्पिटल कोल्हापूर )यांनी पुढील उपचारासाठी डॉ. अक्षय बाफना यांच्याकडे सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये पाठवले. डॉ. बाफना यांनी रुग्णाची तपासणी केली आणि अनुवांशिक Long QT Syndrome असल्याची शक्यता व्यक्त केली. यासाठी आनुवंशिक चाचणी करण्यात आली, जी सकारात्मक आल्याने त्यांनी ड्युअल चेंबर पेसमेकप्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथील कॅथलॅबमध्ये यशस्वीरित्या ड्युअल चेंबर पेसमेकशस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमुळे रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये सुधारणा झाली असून, हृदयाची कार्यप्रणाली अधिक नियमित झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ही प्रक्रिया जलद आणि सुरक्षितपणे पार पडली.
यामुळे रुग्णांच्या जीवनगुणात सुधारणा होण्यास मदत झाली आहे, आणि उपचार रुग्णांना अधिक चांगले जीवन प्रदान करण्यास महत्त्वाचे ठरत आहेत. डॉ. एस. मोरे (डीन), डॉ. मिरगुंडे (एमएस), डॉ. अक्षय बाफना (एचओडी कार्डिओलॉजी), डॉ. अजित हांगे , डॉ. अदीब शेख, डॉ. निखिल गडदे (डीएम कार्डिओ रेसिडेंट्स) डॉ. बी.पाटील, डॉ. मुल्ला, डॉ. देवरे, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, वैष्णवी राजेंद्र , नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडेकर, श्रीकांत पाटील, अमृता रोहम, प्रिया माने, रेखा पाटील, सायली पवार, अवधूत जाधव , ओतारी, आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
इचकरंजीतील महिला रुग्णावर यशस्वी हृदयाची वेगाने होणारी धडधड थांबवणारी पेसमेकर शस्त्रक्रिया करुन जीवनदान.....
|