बातम्या
शेंडा पार्क इथल्या मोकळा जागेवरील गवताला आग.
By nisha patil - 2/22/2025 6:08:48 PM
Share This News:
शेंडा पार्क इथल्या मोकळा जागेवरील गवताला आग.
कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या मोकळ्या जागेवरील वाळलेल्या गवताला आज सकाळी आग लागली. आर के नगर नाक्याजवळ असलेल्या या ठिकाणी सकाळी ११ च्या दरम्यान ही आग लागलीय.
दरम्यान यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच ताराराणी पुतळा परिसरातील अग्नीशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रसंगावधान राखून शर्थीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.
शेंडा पार्क इथल्या मोकळा जागेवरील गवताला आग.
|