बातम्या
आरोग्यदायी दिवा
By nisha patil - 11/12/2024 11:29:02 AM
Share This News:
आपण सर्वजण घरामधील मंदिरात, तुळशीजवळ दिवा लावतो, कारण दिवा लावल्याने तन व मन प्रसन्न होते, भक्ती बरोबर शक्ती हि मिळते, तर हि शक्ती म्हणजे त्या दिव्यामधुन येणारा सुगंध.. आपणांस माहित असेलही कि त्या सुगंधाने आपल्याला निरोगी सुध्दा राहता येऊ शकते.
दिवा कशाचा लावला तर त्याने वातावरण शुध्द होते व आरोग्य कसे चांगले होते किंवा आजारपणात ते कसे फलदायी ठरतात हे पाहुया. दिवा छोटा व मातीचा असणे आवश्यक.
◼️ शुध्द तुपाच्या दिव्यात एक कापुर वडी व एक लवंग टाकल्यास, सतत होणारी सर्दि व डोके दुखी बरी होण्यास मदत होते. दिवसातून केवळ एक वेळेस.
◼️ शुध्द तुपाच्या दिव्यात एक कापुर व एक काळेमिरी टाकल्यास, मानसिक आजार, हातापायात येणारी सुज कमी होण्यास मदत होते.
◼️ मोहरीच्या तेलाच्या दिव्यात हिंग व लवंग टाकल्यास, अंगात होणारी जळजळ, ॲसिडीटी, मळमळ, डोक जड होणे, जुलाब होणे हे विकार थांबण्यास मदत होते.
◼️ मोगर्याचे तेल ( चमेली तेल ) मध्ये दोन थेंब दुधाचे टाकल्यास, सतत होणारी बेचैनी, अंगदुखी, मणक्याचा त्रास, मान अवघडणे हे त्रास बरे होण्यास मदत होते.
◼️सुर्यफुलाच्या तेलाच्या दिव्यात एक कडुलिंबाचे एकपान टाकल्यास कोणत्याही आजारातुन लवकर बरे होण्यास मदत होते.
◼️शुध्द तुपाच्या दिव्यात भिमसेन कापुर व ओवा टाकल्यास हवेतील बारिक किटक जे दिसत नाहीत ते राहत नाही व ॲाक्सीजन चे प्रमाण सामान्यत: वाढण्यास मदत होते.
◼️ शुध्द तुपाच्या दिव्यात खाण्याच्या पानाचे एक देठ, हिंग, एक इलायची, एक लवंग टाकल्यास घरातील मतभेद दुर होतात, शांतता व लहान मुलांचे बुध्दी चातुर्य वाढते.
वरील दिव्यांचे उपाय हे सकाळी व सायंकाळी केल्यास उत्तम, हा दिवा अश्याठिकाणी लावावा कि त्याचा सुगंध हा रूम मध्ये आत येईल, देवघरातच लावणे बंधनकारक नाही. आपण घेत असलेला श्वास व त्यातील सुगंध हे आपल्या शरिरात पोषक स्वरूपात मिळाले तर त्याचा नक्कीच लाभ होतो. हा प्रयोग १० दिवस नियमित केल्यास उत्तम, तीस-या दिवसापासून सकारात्मक परिणाम जाणवू शकतात.
आरोग्यदायी दिवा
|