बातम्या

पूरग्रस्तांना मदतीचा हात...

A helping hand to the flood victims


By nisha patil - 3/8/2024 2:31:00 PM
Share This News:



पूरग्रस्तांना मदतीचा हात... 

पिता-पुत्राकडून पूरग्रस्तांना भोजनाची व्यवस्था

पंचगंगेच्या पुरामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार प्रकाश आवाडे व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्फत स्थलांतरीत झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या छावणीमध्ये दुपारची व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी घोरपडे नाट्यगृह येथे  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी स्थलांतरीत झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना रात्रीचे भोजन वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला.
     

यावेळी राहुल घाट, सागर कम्मे, लालू बंडगर, विनायक म्हेत्रे, प्रविण माळी, अनिल रावळ, गोटू कटके, अवधूत परीट, खंदारे, मिसाळ उपस्थित होते.


पूरग्रस्तांना मदतीचा हात...