बातम्या
चिंचवडमध्ये केएमटी बसला भीषण आग...
By nisha patil - 8/1/2025 6:31:17 PM
Share This News:
चिंचवडमध्ये केएमटी बसला भीषण आग...
शॉर्ट सर्किटमुळे प्रसंग ..जीवितहानी टळली
चिंचवड स्थानकावर नेहमीप्रमाणे दुपारी साडेबारा वाजता आलेल्या केएमटी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्रवासी बसमध्ये चढण्याआधीच ही आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी वेळेत पोहोचलेल्या महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. या घटनेमुळे चिंचवड परिसरात सध्या मोठी खळबळ माजली आहे.
चिंचवडमध्ये केएमटी बसला भीषण आग...
|