बातम्या
मलकापूर येळाणे येथे रिक्षाच्या धडकेत पादचारी जागीच ठार
By nisha patil - 5/3/2025 3:36:41 PM
Share This News:
मलकापूर येळाणे येथे रिक्षाच्या धडकेत पादचारी जागीच ठार
शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर - येळाने येथे पाई चालत असताना मागून येणाऱ्या रिक्षाने जोराची धडक दिल्याने राकेश डोंगरे या 36 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी कोपार्डे येथील रिक्षाचालक प्रमोद आनंदा कांबळे याच्या विरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,राकेश श्रीकांत डोंगरे हा राधानगरी येथील रहिवाशी, सोमवारी रात्री 9 वाजता येळाने इथून रस्त्यावरून पायी चालत जात होता. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात राकेश डोंगरे यांचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस अमलदार संभाजी पाटील करीत आहेत.
मलकापूर येळाणे येथे रिक्षाच्या धडकेत पादचारी जागीच ठार
|