बातम्या

एक राखी पत्रकार बंधूंसाठी .....

A rakhi for journalist brothers


By nisha patil - 8/22/2024 4:15:20 PM
Share This News:



140 वर्षाची शैक्षणिक परंपरा असलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर मध्ये एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी  हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम व पत्रकारांचा गुणगौरव समारंभ नुकताच  संपन्न झाला यासाठी  एनसीसीच्या एअर विंग आणि आर्मी बटालियन तसेच नुकत्याच 18 वी राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थिनीनी उपस्थित पत्रकारांना व संस्थेतील पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना राखी बांधूली दर वर्षी प्रशालेमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा घेतली जाते आणि तयार झालेल्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवल्या जातात गेल्यावर्षीपासून  रक्षाबंधनाचा कार्यक्रम प्रशालेत साजरा केला जातो यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बंधूंनाराखी बांधली गेल्या वर्षी मीडियातील विविध छायाचित्रकारांचा गौरव करून त्यांना राखी बांधली यावर्षी सर्व मीडियातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव करून राखी बांधण्यात आले.

 कला विभाग प्रमुख प्रशांत जाधव  यांच्या संकल्पनेतून व  मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर यांच्या मार्गदर्शनाने हा  उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी संस्थेचे नियमक मंडळाचे चेअरमन मा उदय सांगवडेकर व्हाईस चेअरमन.  मा.डाॅ. सुनील कुबेर नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मा अरुण डोंगरे कार्यवाह सौ शरयू डिंगणकर कोषाध्यक्ष गिरीश जांभळीकर यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मानपत्र, स्नेहभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार  सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील अशा उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी बुलढाणा येथे आयोजित 18 वी राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत प्रशालेच्या विजेत्या मुलींच्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

या  उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची व आपल्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बंधू भावाच्या प्रेमाची  राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


एक राखी पत्रकार बंधूंसाठी .....