बातम्या

सी पी र रुग्णालयात ११ वर्षीय बालकावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

A risky surgery on an 11 year old child was successfully completed at CP Hospital


By nisha patil - 6/29/2024 12:21:48 PM
Share This News:



11 वर्षीय मुलगा , राहणार  उपवडे , कोल्हापूर, सतत डोकेदुखी , श्र्वासो श्वासवासाचा त्रास आणि 2 वर्षांपासून अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नसल्याची तक्रार करत होता ... मात्र गेल्या 6 महिन्यांपासून त्याला थकवाही येऊ लागला होता . ही सर्व लक्षणे वाढतच चाल ली होती म्हणून त्यांनी एका खाजगी रुग्णालयात दाखवले .

त्याला 220/100 mmHg इतका उच्च रक्तदाब होता .अशा उच्च रक्तदाबामुळे त्या रुग्णाला डॉ.अक्षय बाफना यांनच्याकडे CPR हॉस्पिटल ,कोल्हापूर येथे पुढील तपासणीसाठी पाठवले. डॉ. बाफना, डॉ. मोरे आणि डॉ. जाधव (ज्येष्ठ रहिवासी) यांना उच्च रक्तदाब आणि वरच्या अंगात आणि खालच्या अंगात बीपीमध्ये फरक आढळला. वरच्या अंगात BP 220/104mm hg आणि खालच्या अंगात 80/60 mmHg होते आणि खालच्या अंगात अत्यंत कमकुवत पल्सेशन जाणवले. 2Decho केल्यावर इंटरप्टेड ऑर्टिक आर्कचे निदान होते ( एक जन्मजात स्थिती ज्यामध्ये महाधमनीमध्ये अत्यंत गंभीर स्टेनोसिस (ब्लॉक) असतो ( हृदयापासून शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत रक्तवाहिनीचे प्रमुख शुद्ध रक्त ) .याचा परिणाम हाताच्या वरच्या भागात हाय बीपी होतो आणि शरीराच्या खालच्या अर्ध्या भागात कमी रक्तदाब ...  रुग्णाचा  सीटी एओर्टोग्राम डॉ. राहुल पाटील यांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये केले आणि महाधमनीच्या त्याच अत्यंत गंभीर कोअर्टेशनची पुष्टी केली ज्यामध्ये 99.9% ब्लॉकचा व्यत्यय आला. डॉ. अक्षय बाफना (हृदयरोग तज्ज्ञ आणि प्रमुख) आणि डॉ. हार्दिक मोरे यांनी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे त्यांच्या हार्ट टीमसह Co- arctoplasty  with stenting करण्याचा निर्णय घेतला. 12 मिमी x 33 mm झेफिर एल स्टेंट 12 पेरिफेरल balloon वरती क्रिंप केला  आणि तो फक्त4 mm लहान  उजव्या पायाच्या रक्तवाहिनी आणि डाव्या हाताच्या ३mm रक्तवाहिनी माध्यमातून स्टेंट लावला गेला , रक्तवाहिन्यांच्या आकारा मुळे  ही शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम होती).
 

स्टेंटसह  कोअर्क्तोप्लास्टी कोणत्याही टाक्या शिवाय यशस्वीरित्या केली गेली आणि वरच्या आणि खालच्या अंगांमधील दाब जवळजवळ समतोल करून बीपी 120 / 80 mmHg पर्यंत खाली आला.
MJPJAY योजनेंतर्गत संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पडली.

 

 डॉ. एस. मोरे (डीन), डॉ. मिरगुंडे (एमएस), डॉ. सर्वोदय, डॉ. नीलम (बालरोग विभाग), भूलतज्ज्ञ डॉ. राहुल / डॉ. दीपक आणि टीम, डॉ. अक्षय बाफना (एचओडी कार्डिओलॉजी), डॉ. हार्दिक मोरे (सहाय्यक प्रा. .), डॉ. विदुर, डॉ. अजित हांगे , डॉ. अदीब शेख, डॉ. निखिल गडदे (डीएम कार्डिओ रेसिडेंट्स) डॉ. बी.पाटील, डॉ. मुल्ला, डॉ. देवरे, डॉ. स्फुर्ती जाधव तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे, वैष्णवी राजेंद्र , नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडकर, प्रिया माने, श्रीकांत पाटील, पल्लवी खाडे, सुनीता होनावर, अमृता रोहम,रेखा पाटील, सायली पवार, अमृता मेधा, अवधूत , ओतारी आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.


सी पी र रुग्णालयात ११ वर्षीय बालकावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण