बातम्या

व्हायरल क्लीपवर आव्हाडांचा गंभीर आरोप

A serious allegation of abuse over a viral clip


By nisha patil - 8/26/2024 10:21:41 PM
Share This News:



 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड  यांच्या व्हायरल क्लीपमुळे आता मनसे  आणि आव्हाड यांच्यातच खडाजंगी होणार असल्याचे दिसून येते. मनसे नेते संदीप देशपांडे  यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ शेअर केला आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, ही ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची असल्याचे बोललं जात आहे. आता, पाच सहा वर्षांपूर्वीच्या ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरच गंभीर आरोप केले आहेत. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणारच ना, तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. 
         

राज ठाकरे बदलापूरला आतापर्यंत का गेले नाहीत,अशा प्रकरणात माणुसकीच्या नात्याने 24 तासात पोहोचायला हवं. मराठी मनाचा अभिमान असणारे राज ठाकरे तुमचा हात त्या पोरीच्या आईच्या डोक्यावरुन, पोरीच्या बापाच्या डोक्यावरुन फिरवायला हवा होता, आणि माझ्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तसेच, मी जर सांगितलं की, माझा हा आवाजच नाही तर हे काय तपासायला जाणार आहेत? मी सांगतो हा माझा आवाजच नाही, राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात त्यांनीच माझा आवाज काढून क्लिप तयार केली, तुम्हाला माहित आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.


व्हायरल क्लीपवर आव्हाडांचा गंभीर आरोप