बातम्या

केरळ मध्ये माणुसकीला लाजवणारी घटना...

A shameful incident in Kerala


By nisha patil - 8/26/2024 3:28:18 PM
Share This News:



 आजकाल माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सतत घडताना पाहायला मिळताहेत . या सततच्या होणाऱ्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला.  आरोपींना फाशी द्या, अशी एकच मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे. एकीकडे देशभरातून आक्रोश, संताप पाहायला मिळत आहे. असं असूनही दुसरीकडे मात्र, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याच नाव घेईनात. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 70 वर्षीय महिलेच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घरातलं सर्व सोनं साफ करुन निघून गेले. पण, चोरट्यांनी 70 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. 
     

केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे माणुसकीलाही लाज वाटली असेल. शनिवारी रात्री एका 70 वर्षीय महिलेच्या घरावर चोरट्यांनी दरोडा घातला. यादरम्यान, कथितरित्या महिलेवर अत्याचारही करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. 
     

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ तपासाची सूत्रं हलवली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. केरळ पोलिसांनी कनककुन्नू इथून 29 वर्षीय धनेश नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीविरोधात वृद्ध महिलेच्या घरातून 7 तोळं सोनं चोरल्याचा आरोप आहे. याव्यतिरिक्त वृद्ध महिलेवर आरोपीनं बलात्कार केल्याचंही बोललं जात आहे. सोनं विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.


केरळ मध्ये माणुसकीला लाजवणारी घटना...