बातम्या

एका छोट्याशा चुकीने अभिनेत्याला गमवावे लागले आपले प्राण

A small mistake cost the actor his life


By nisha patil - 6/24/2024 7:35:23 PM
Share This News:



एका छोट्याशा चुकीने अभिनेत्याला आपले प्राण गमवावे लागले आहे.  अभिनेता रणदीप सिंह भांगू  याच्या निधनाने पंजाबी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 32 व्या वर्षी रणदीपचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  रणदीप भांगूच्या अकाली निधनाची बातमी पसरताच पंजाबी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. अभिनेता करमजीत अनमोल याने सोशल मीडियावर पहिल्यांदा त्याच्या निधनाची माहिती दिली. पंजाबी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या पॉलिवूडच्या  फेसबुक पेजवर रणदीपच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. 'अत्यंत जड अंत:करणाने, या नश्वर जगाचा निरोप घेणारा तरुण अभिनेता रणदीप सिंह भांगू यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करत असल्याचे सोशल मीडिया पेजवर नमूद करण्यात आलेरणदीपच्या मृत्यूबाबत पोलीस तपास करत आहेत. अभिनेता रणदीप हा मागील काही दिवसांपासून दारूचे सेवन करत होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.


एका छोट्याशा चुकीने अभिनेत्याला गमवावे लागले आपले प्राण