बातम्या

शाहू कारखाना मॅटवरील कुस्ती स्पर्धा

A wrestling match on the shahu factory mat


By nisha patil - 8/17/2024 6:53:14 PM
Share This News:



कागल, प्रतिनिधी. शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत सायली दंडवते व सुकन्या मिठारी यांनी ७६किलो वजन गटात तर ४० किलो वजन गटात अमृता धनगर(तळंदगे),प्रणिती साठे(नंदगाव )वेदिका पाटील (पाचगाव) व आदिती कापडे(म्हाकवे)यांनी अंतिम फेरी प्रवेश केला.
काल शुक्रवारी बालगटातील लढती संपन्न झाल्या.आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१७) महिला व कुमार  गटात १४०मल्लांची नोंदणी झाली. उद्या रविवारी( ता.१८) रोजी मुलांच्या सिनियर  व ज्युनियर गटातील लढती होतील.तर सोमवारी(ता.१९) सर्व गटातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठीच्या अंतिम लढती होतील.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.विक्रमसिंह घाटगे  यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मॅटवरील कुस्ती स्पर्धा आता शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून  सलग ३८ व्या वर्षी संपन्न होत आहेत.त्यास मल्लांसह कुस्ती शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बाल गटातील अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मल्लांची गटवाईज नावे अशी आहेत.
 
२४किलो गट - विश्वजीत शिनगारे तळंदगे, रुद्र पाटील बानगे,अथर्व पोतदार सिद्धनेर्ली,संचित पाटील मळगे खुर्द.

 २६किलो गट - संग्राम शिनगारे तळंदगे, ओम पोटले मतिवडे,राजवीर कुंभार एकोंडी,वैष्णव साबळे खेबवडे.

 २८ किलो गट-साईराज सुळगावे एकोंडी, करण तोडकर द-याचे  वडगाव,यश मगदूम सिद्धनेर्ली,श्रेयस पाटील कसबा सांगाव.

 ३०किलो गट-प्रेम शिनगारे तळंदगे,शिवेंद्रकुमार पाटील बामणी, रुद्राक्ष तळेकर केनवडे,राजवीर पोवार कागल.

 ३२ किलो गट- श्रेयश पुजारी तळंदगे,रितेश मगदूम बानगे,शिवरुद्र चौगुले शाहू साखर एकोंडी,सोहम पाटील म्हाकवे 

 ३५किलो गट- पृथ्वीराज मोहिते कोगील बुद्रुक,रणवीर सावंत उंदरवाडी,ओंकार काशीद दिंडनेर्ली,गजानन पाटील केनवडे

 ३८ किलो गट- समर्थ खंदारे सुरूपली,संस्कार माने सिद्धनेर्ली,अक्षय माने शेंडूर,नील भारमल मुरगुड

४१किलो गट - रविराज पाटील बानगे,हर्ष टिक्के नंदगाव,सोहम पाटील कंदलगाव, आदित्य पाटील बेलवळे खुर्द.

  छायाचित्र- कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या मॕटवरील कुस्ती स्पर्धेतील महिला गटातील लढतीतील एक थरारक  क्षण


शाहू कारखाना मॅटवरील कुस्ती स्पर्धा