बातम्या

माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड राज ठाकरे... अमोल मिटकरी

AMIL MITKAR


By nisha patil - 7/31/2024 2:05:51 PM
Share This News:



उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी  यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही  नाव घेण्यात आलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील   सिव्हील लाईन पोलिसांत घडलेल्या घटनेबाबत जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे या दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

                   

तसेच, माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे  राज ठाकरेच असल्याचा  खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय पोलीसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसेसैनिक फरार राहू शकत नाही, असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले. परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.


माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड राज ठाकरे... अमोल मिटकरी