बातम्या

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याना पुन्हा जेल मध्ये परतावे लागणार -सर्वोच्च न्यायलयाचा आदेश

ARUN GAVALI


By nisha patil - 7/31/2024 2:11:50 PM
Share This News:



शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात अरूण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.अरुण गवळी यांना हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या ते नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात आहेत. 2006 मध्ये जारी केलेल्या एका शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षेत सूट देण्यासाठी गवळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

          नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. यानंतर अरुण गवळी यांच्या सुटकेबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या गृह विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. यात अरुण गवळी यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. त्यांना पुन्हा जेलमध्ये परतावे लागेल, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहे.
           

   अरुण गवळी यांच्या जामिनाप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यात अरुण गवळी यांना कोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही. याप्रकरणी अरुण गवळींना पुन्हा एकदा पॅरोल देण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे.

यामुळे अरुण गवळी यांना लवकरच जेलमध्ये परतावे लागणार आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.


अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याना पुन्हा जेल मध्ये परतावे लागणार -सर्वोच्च न्यायलयाचा आदेश