बातम्या
काँग्रेस पक्षात नाना भाऊ, विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती
By nisha patil - 7/30/2024 6:02:14 PM
Share This News:
लाडकी बहीण योजना हि लाडक्या खुर्चीसाठी आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली होती. विजय वडेट्टीवार यांच्या या टीकेला आता भाजपनेही प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षात नाना भाऊ, विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती असतांना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी दुसऱ्यांवर टीका करत बसण्यापेक्षा काँग्रेस पक्षात काय सुरू आहे त्याकडे लक्ष घालावे असे म्हणत भाजप नेते आशिष देशमुख यांनी विजय वडेट्टीवारांवर तोफ डागली आहे.
राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चलती आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना आपला अर्ज दाखल केला असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारकडून 19 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशातच या योजनेवरुन रोज नवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून सध्या राजकीय वादंग सुरू आहे. नुकतेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला आता भाजपकडूनही पलटवार केला जात आहे.
काँग्रेस पक्षात नाना भाऊ, विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती
|