बातम्या

कोवाड मधील ए टी एम फोडीचा गुन्हा उघड

ATM robbery case in Kovad revealed


By nisha patil - 1/16/2025 3:21:38 PM
Share This News:



कोवाड मधील ए टी एम फोडीचा गुन्हा उघड 

चार आरोपींना अटक 

चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेतील एस बी आय बँकेचे एटीएम फोडून 18 लाख 77 हजार 300 रुपये लंपास करून पळून गेलेल्या राजस्थान मधील चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय.साध्या वेशात सापळा रचून पालघर जिल्ह्यातील मनोर गावात ही कारवाई करण्यात आलीय. तसलीम इसा खान,अली शेर, जमालू खान,तालीम पप्पू खान,अक्रम शाबु खान अशी आरोपींची नावे आहेत.

 कोवाड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी गॅस कटरने कापले होते. त्यातील 18 लाख 77 हजार 300 इतकी रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी चार चाकी वाहनातून पलायन केले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पण पोलिसांच्या वाहनाला त्यांनी धडक दिली. दरम्यान त्यांची गाडी बंद पडली आणि ते सर्वजण पळून गेले . या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यांना करण्याचे सांगितले. ते तपास करत असताना आरोपीची हुंडाई कंपनीची क्रेटा चार चाकी गाडीला एम एच झिरो वन EV 9918 ही नंबर प्लेट बनावट असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला लक्षात आल. मूळ क्रमांक राजस्थान मधील होता. पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन गाडी मालकाची भेट घेतली.गाडी मालकाने आपला मित्र तसलीम खान याने ही गाडी कामानिमित्त घेऊन गेल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयतांची माहिती गोळा केली.

ते सर्वजण पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद रोडवरील मनोर गावातील सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचे समजले.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, दीपक घोरपडे, महेश पाटील, राजू कांबळे,हंबीर अतिग्रे यांनी धाबा परिसरात साध्या वेशात जाऊन सापळा लावला आणि मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केलीय. पुढील तपासासाठी आरोपींना चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलय.


कोवाड मधील ए टी एम फोडीचा गुन्हा उघड
Total Views: 134