बातम्या

नागपुरात डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार

Abuse of women by doctors in Nagpur


By nisha patil - 1/17/2025 2:24:39 PM
Share This News:



 नागपुरात डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार

कठोर कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश 

 नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आलीय. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.
 


नागपुरात डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार
Total Views: 56