बातम्या

25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात

Accident of school bus carrying 25 students


By nisha patil - 4/7/2024 7:47:45 PM
Share This News:



२० ते 25 विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कुल बसचा अपघात झाला.पिंपरी चिंचवड जवळ ही घटना घडली आहे.अपघातग्रस्त बस इंद्रायणी नदीत  कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली. दैवाने बसचे चाक पुलाच्या बॅरेंगेटिंगमध्ये अडकले.
 

अन्यथा विद्यार्थ्यांसह ही बस नदीत बुडाली असती.चऱ्होली गावालगत हा अपघात आज  दुपारी साडे तीनच्या सुमारास झाला. सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.मात्र, सुदैवाने कोणतीही जिवितहानी न झाल्याने अनर्थ टळला आहे.


25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात