बातम्या

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज, नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

According to the current situation


By nisha patil - 7/23/2024 9:48:22 PM
Share This News:



सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा. पर्जनमान्य व बंधाऱ्यांची पाणी पातळी, होणारे विसर्ग यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे वाटचाल करीत आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच काही आपत्तीजन्य बाब वाटत असेल तर याची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा त्यांनी घेतला. सध्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे रस्तेमार्ग बंद होत आहेत. सर्व शासकीय यात्रणांनी त्यांच्याकडील बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची तपासणी करावी. पाणी पातळी वाढल्यामुळे करवीर, हातकणंगले, इचलकरंजी सह सर्व जिल्ह्यातील गावांमधील लोकांची काळजी घेण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना ही श्री. येडगे यांनी बैठकीत दिल्या.

सध्या कोयना नदीच्या पाण्यामुळे कृष्णा नदीचीही पाणी पातळी वाढू शकते. सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुकांच्या आढावा घेवून परिस्थितीनुसार नियोजन करावे, ज्या पुरभागात गरोदर माता आहेत त्यांच्यासाठी सुरक्षित स्थळी राहण्याची सोय करावी. सर्व परिस्थितीचा विचार करता उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, मुध्याधिकारी यांनी तातडीने जबाबदारी स्वीकारुन कामकाज करावे, असेही ते म्हणाले.

 

            जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, मागच्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज सरासरी 40 मी.मी. पाऊस पडत आहे. तर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये सरासरी 100 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 8 राज्य मार्ग व 20 प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. पर्यांयी रस्त्यांची माहिती नागरिकांना दिली जात असून पर्यायी मार्गानी वाहतुक सुरळीत सुरु आहे. मागील 6 दिवसांमध्ये झालेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ही 18 तारखेला 23 फुटावर होती. ती आज दुपारी  41 फुटांच्या पुढे जात धोका पातळीकडे वाटचाल करीत आहे. हे सर्व पर्जन्यमान व वेगवेगळ्या बंधाऱ्यांची पाणी पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी जाऊ शकते, अशा ठिकाणी प्रशासनाने भेटी दिल्या आहेत. काही ठिकाणी नागरिक व कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागु शकते, त्यांच्यासाठी निवारा केंद्रांची तयारीही प्रशाससाने केली असल्याची माहिती त्यांनी दिली.   

 नागरिकांना पुरस्थितीच्या अनुषंगाने माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप क्रमांक सुरु केला असून तो क्रमांक 9209269995 असा आहे. या क्रमांकावर आपणास जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाची, पर्जन्यमान, बंधाऱ्यांची पाणी पातळी इ. माहिती रिअल टाईम मध्ये मिळेल. याशिवाय  नियंत्रण कक्षाचा  1077 हा टोल फ्री नंबर 24 तास सुरु आहे. नागरिकांना माहिती घ्यायची असेल किंवा आपत्ती बाबत माहिती द्यायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावे, असे त्यांनी आवाहन केले आहे


पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज, नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन