बातम्या

बेकायदेशीर गावठी पिस्टलसह आरोपीला अटक

Accused arrested with illegal village pistol


By nisha patil - 9/21/2024 8:21:58 PM
Share This News:



: बाचणी गावातील केरकळ खराड्याचा माळ येथे एका तरुणाला बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल आणि राऊंड जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव (वय २४) याला सांगली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना आरोपी ऋत्विक जाधव पिस्टल घेऊन परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे आणि गुन्हे शोध पथकाने खराड्याचा माळ येथे सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कमरेला खोवलेले गावठी पिस्टल आणि ४ राऊंड गोळ्या जप्त करण्यात आल्या. या शस्त्राची एकूण किंमत अंदाजे ₹५०,४०० आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


बेकायदेशीर गावठी पिस्टलसह आरोपीला अटक