बातम्या

आदर्श गुरुकुल शिक्षण संकुल पेठवडगाव मध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

Adarsh gurukul education pethapadgav


By nisha patil - 7/29/2024 9:44:59 PM
Share This News:



आदर्श गुरुकुल शिक्षण संकुल पेठवडगाव  या ठिकाणी शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन दिवस . दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस . तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस .

चौथा सांस्कृतिक दिवस.   पाचवा दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस. सहाव्या दिवशी मिशन लाईफ दृष्टीक्षेपात एको क्लब उपक्रम./शालेय पोषण दिवस. आज सातव्या दिवशी समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा करण्यात आला. अशाप्रकारे सर्वांच्या सहकार्याने शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी .एस घुगरे सर संस्थेच्या सचिवा तथा आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. एम डी घुगरे मॅडम यांची प्रेरणा मिळाली.

तसेच ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आर. बी शिवई यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे तपासणीस अधिकारी ए डी खोंद्रे सरांचे मार्गदर्शन लाभले. उपमुख्याध्यापक   एम एच चौगुले सरांचे मार्गदर्शन लाभले.


आदर्श गुरुकुल शिक्षण संकुल पेठवडगाव मध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा