विशेष बातम्या
शिवसेनेकडून वाल्मीक कराडच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
By nisha patil - 4/3/2025 10:16:36 PM
Share This News:
शिवसेनेकडून वाल्मीक कराडच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
कोल्हापूर : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या विरोधात शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात "जोडे मारो आंदोलन" केले.
या वेळी वाल्मीक कराडला फाशी द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली. हत्याकांडातील आरोपींचे फोटो व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलनात शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनेकडून वाल्मीक कराडच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
|