राजकीय
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनाच पहिली पसंती...
By nisha patil - 11/25/2024 12:00:14 PM
Share This News:
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनाच पहिली पसंती...
मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनाच मिळण्याची शक्यता..
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स कायम असताना भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांच्याकरता अनुकूल आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकतीनिशी भाजपाच्या मागे उभा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत घसरलेला कामगिरीचा आलेख कमालीचा उंचावला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तर वाढलीच त्याचबरोबर भाजपालाही घवघवीत यश मिळालं आहे.
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनाच पहिली पसंती...
|