बातम्या

तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने विशाळगडावरील संचारबंदी उठवली...

After almost five months


By nisha patil - 8/1/2025 6:32:19 PM
Share This News:



तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने विशाळगडावरील संचारबंदी उठवली...

विशाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला...
 

अतिक्रमण बांधकामावरून पाच महिन्यापूर्वी सुरु झालेल्या घटनेमुळे पर्यटकांसाठी बंद असलेला विशाळगड किल्ला आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. गेल्या पाच महिन्यापासून सुरू असलेली संचारबंदी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी शिथिल केलीय. अटी आणि शर्तीचे पालन करून पर्यटकांना विश्रागडावर प्रवेश दिला जाणार आहे. ही संचारबंदी 31 जानेवारीपर्यंत उठविण्यात आलीय.  
 

विशाळगडावरील अनधिकृत बांधकामे हटवावीत. या मागणीसाठी हिंदुत्ववाद्यांनी आवाज उठवला होता. विशाळगडाच्या पायथ्यांनी असलेल्या गजापूर गावात हल्लेखोरांनी अल्पसंख्यांकाच्या घरावर हल्ला करून प्रार्थनास्थळाचेही नुकसान केले. त्यानंतर राज्यसरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. विशाळगडावरील सुरू असलेल्या संचार बंदीमुळे विशाळगडाच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे गडावरील संचारबंदी उठवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारने गडावरील संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे ही संचारबंदी 31 जानेवारीपर्यंत उठविण्यात आलीय. पर्यटकांना नियम व अटी पाळून विशाळगडावर जाता येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना गडावर सोडण्यात येणार आहे.


तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने विशाळगडावरील संचारबंदी उठवली...
Total Views: 55