बातम्या

लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

After the fight against sexual harassment


By nisha patil - 7/20/2024 4:10:10 PM
Share This News:



राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये वारंवार पराभवाचा सामना कराला लागल्यानंतर रितिकाचा आत्मविश्वास पुरता डळमळीत झाला होता. पण ढासळत चाललेल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं होतं. पण त्यावेळी भारतात कुस्ती स्पर्धा किंवा सराव थांबलेला होता.  गेल्यावर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यांनी मात्र वारंवार हे आरोप फेटाळले आहेत.
     

    क्रीडा मंत्रालयानं त्यांना हटवलं नाही. पण, सुरुवातीच्या चौकशीत लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली संपूर्ण कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला. नंतर महासंघाच्या देखरेखीत एक अ‍ॅड-हॉक कमिटी नेमण्यात आली होती.  रितिकाने देशातील सर्वात प्रतिष्ठित कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलन करत असलेलं पाहिलं.त्यात भारतासाठी पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीपटू साक्षी मलिकही होती. ती रितिकाचं प्रेरणास्थान होती.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाची बातमी जगभर पसरली.विशेषत: त्यांनी संसद भवनापर्यंत मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना ‘परवानगी नाही’ या कारणाखाली अटक केली होती, तेव्हा याची प्रचंड चर्चा झाली.


लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू