बातम्या

दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन

Aggressive protest in the Dikshabhumi area by the citizens strongly opposing the underground parking


By nisha patil - 1/7/2024 9:55:46 PM
Share This News:



दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली आहे. तर इतर विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलतांना व्यक्त केली आहे. तर या प्रकरणाचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनात देखील उमटतान दिसत आहे. परिणामी, राज्यभरातून होत असलेल्या या विकासकामाला राज्यसरकारने स्थगिती दिली आहे.
 

याबाबत अधिकृत घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली आहे. मात्र आम्हाला जोपर्यंत याबाबत लिखित स्वरूपात आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशाशन या आंदोकलकांना कशा पद्धतीने समजूत काढेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन