बातम्या
नितेश राणे यांचे आक्रमक वक्तव्य; विरोधकांचा तीव्र संताप
By nisha patil - 2/14/2025 11:04:00 PM
Share This News:
नितेश राणे यांचे आक्रमक वक्तव्य; विरोधकांचा तीव्र संताप
मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत, "ज्या गावांत महाविकास आघाडीची सत्ता आहे, तिथे एक रुपयाचाही निधी देणार नाही," असा इशारा दिला. तसेच "निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि पक्षात प्रवेश करा," असेही ते म्हणाले.
या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "निधी हा सरकारचा असतो, नितेश राणे त्यांच्या घरातून देणार आहेत का?" असा सवाल आव्हाड यांनी केला. तर अंधारे यांनी "लोकशाही आहे की हुकूमशाही?" असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, नितेश राणे यांनी "भाजपचा परिवार वाढत असून पक्ष 1 नंबरवर राहिला पाहिजे," असेही स्पष्ट केले.
नितेश राणे यांचे आक्रमक वक्तव्य; विरोधकांचा तीव्र संताप
|