बातम्या

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात - राजु शेट्टी

Agriculture loss due to central and state government policies  Raju Shetty


By nisha patil - 1/7/2024 9:58:44 PM
Share This News:



केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागलीय.वाढलेली महागाई , नैसर्गिक आपत्ती , खतांचे वाढलेले दर , सरकारचे शेतीमालाच्या चुकीचे आयात-निर्यात धोरण,रासायनिक खते,बि-बियाणे ,किटकनाशके ,शेती औजारे याच्या माध्यमातून जी. एस. टी चा शेतक-यावर पडलेला बोजा यामुळे कर्जाचा डोंगर वाढू लागलाय. परिणामी शेतीतून लोक बाहेर पडू लागलेत.यामुळे सरकारने शेतक-यांची संपुर्ण कर्जमाफी करावी ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलीय.यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मगावातून निघालेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणालेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही देशामध्ये शेतक-यांच्या आत्महत्या वाढतायत. यवतमाळ जिल्ह्याने राज्याला हरितक्रांतीचा नारा दिला. त्याच जिल्ह्यात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करू लागलाय. यामुळे राज्यात कर्जमुक्ती आंदोलनाचा डांगोरा पिटारून शेतक-यांच्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते सर्व अर्ज राष्ट्रपतींना निवेदन देवून कर्जमुक्तीचे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही सरकारने या गोष्टीबाबत गांभीर्याने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलय.

तर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण बनविणा-या शेतक-यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती करून उत्पादन खर्चावर आधारित दिडपट हमीभाव द्यावा लागेल. पिकांचा हमीभाव ठरविला जात असताना सरकारने वास्तव खर्चाचा अहवाल सादर केल्यास शेतकरी आत्महत्यांचे गुढ उलगडले जाईल.असेही शेट्टी म्हणालेत.


यावेळी स्वाभिमानीचे डॅा. प्रकाश पोपळे , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक , स्वाभिमानीचे विदर्भ प्रवक्ता मनिष जाधव ,हणमंत राजुगोरे, परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे , पुसद तालुकाध्यक्ष 
गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे उपसरपंच विलास आडे यांच्यासह ग्रामस्थ ऊपस्थित होते.


केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात - राजु शेट्टी