मनोरंजन
आई तुळजाभवानी मालिकेचे 100 भाग पूर्ण
By nisha patil - 1/15/2025 8:55:36 PM
Share This News:
आई तुळजाभवानी मालिकेचे 100 भाग पूर्ण
कलर्स मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेली आई तुळजाभवानी या मालिकेने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीतच स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप आशीर्वादामुळे आज मालिकेने आपले 100 यशस्वी भाग पूर्ण केलेत. अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले, महिषासुर आणि देवीचे चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमके कसे लढले गेले. दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती. ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गंमतीदार नातेही पाहायला मिळतंय.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कधी ना पाहिलेली महागाथा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आम्हाला प्रचंड समाधान मिळत आहे अशी भावना ह्या मालिकेचे निर्माते तसेच दिग्दर्शक मकरंद माने ह्यांनी व्यक्त केलीय. इथून पुढे सुद्धा असेच आपले प्रेम या मालिकेवर राहू हे असे आवाहन मालिकेचे निमति दिग्दर्शक यांनी केले. या पत्रकार परिषदेला निर्मात शशांक शेंडे, दिग्दर्शक मकरंद माने, विजय शिंदे, कार्यकारी निर्मात समीर कवठेकर, मुख्य कलाकार अभिनेत्री पूजा काळे अभिजीत श्वेतचंद्र आदी कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.
आई तुळजाभवानी मालिकेचे 100 भाग पूर्ण
|