बातम्या
ऐश्वर्या देसाई ठरल्या ‘महिंद्रा थार’चे मानकरी* डीवायपी सिटी मॉल दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचा लकी ड्रॉ
By nisha patil - 12/23/2024 8:25:06 PM
Share This News:
*ऐश्वर्या देसाई ठरल्या ‘महिंद्रा थार’चे मानकरी*
डीवायपी सिटी मॉल दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचा लकी ड्रॉ
झुवेरीया मणेर व विकीता अदानी ठरले दुचाकीचे भाग्यवान विजेते
डी.वाय.पी सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलच्या ‘लकी ड्रॉ’ मध्ये कोल्हापूरच्या ऐश्वर्या देसाई हे ‘महिंद्रा थार’ या पहिल्या बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरले आहेत. झुवेरीया युनुस मणेर (कोल्हापूर) हे यामाहा रे झेडआर तर विकीता अदानी (इचलकरंजी) यामाहा फसिनो दुचाकीचे मानकरी ठरले.
डीवायपी सिटी येथे २० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये डीवायपी सिटीमधील विविध आउटलेटमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वितरीत केलेल्या लकी ड्रॉ कुपन्सची सोडत डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उद्योजक ललित संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. अर्जुन ऋतुराज पाटील आणि आर्यमन ऋतुराज पाटील यांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
यावेळी सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, हेड रिटेल निखिल यादव, अजित पाटील, तानाजी जाधव यांच्यासह विविध आउटलेटचे प्रमुख, ग्राहक, कर्मचारी उपस्थित होते.
ऐश्वर्या देसाई ठरल्या ‘महिंद्रा थार’चे मानकरी* डीवायपी सिटी मॉल दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचा लकी ड्रॉ
|