बातम्या
आकाशवाणी कोल्हापूरवरून देणार विविध योजनांची माहिती
By nisha patil - 11/9/2024 11:40:28 PM
Share This News:
महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये गो ग्रीन योजना, अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुर्याघर योजना आदी योजनांचा समवेश होतो. तसेच महावितरणने ग्राहकांसाठी मोबाईल अॅप विकसित केले असून त्याच्या माध्यमातून अनके सुविधा ग्राहकांना एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
महावितरणच्या या विविध योजना व ऑनलाईन सुविधा यांची माहिती महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर हे आकाशवाणी कोल्हापूर वरून देणार आहेत. 'इंद्रधनू' या कार्यक्रमात शुक्रवारी (दि.१३) रोजी आकाशवाणी कोल्हापूर (१०२.७ मे.ह.) वरून सकाळी १०.३० वाजता ही मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण चिपळूणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने मुलाखतीत देण्यात येणारी माहिती सर्व ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. नागरिकांनी ही मुलाखत आवर्जून ऐकावी व या माहितीचा उपयोग करून विविध योजनांत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महावितरण करत आहे.
आकाशवाणी कोल्हापूरवरून देणार विविध योजनांची माहिती
|